Saturday, March 06, 2021 | 12:32 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

अभिनेते राजीव कपूर यांचे निधन
09-Feb-2021 02:42 PM

मुंबई । प्रतिनिधी ।  

दिवंगत अभिनेता ऋषी कपूर यांचा धाकटा भाऊ आणि अभिनेते राजीव कपूर यांचं निधन झालं आहे. ते 58 वर्षांचे होते. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे मंगळवारी (9 फेब्रवारी) त्यांची प्राणज्योत मालवली आहे. अभिनेत्री नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.

मी माझा धाकटा भाऊ आज गमावला आहे. आता तो या जगात नाही. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र, त्याचे प्राण वाचवता आले नाहीत. मी आता रुग्णालयात आहे आणि त्याचं शव मिळण्याची वाट पाहतोय, अशी पोस्ट रणधीर कपूर यांनी केली आहे. तर रणधीर यांच्याप्रमाणेच नीतू कपूर यांनीदेखील राजीव कपूर यांचा फोटो शेअर करत या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

राजीव कपूर यांनी राज कपूर दिग्दर्शिक 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्‍वात पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्यांनी ङ्गप्रेम ग्रंथफ या चित्रपटाचं दिग्दर्शनदेखील केलं होतं.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top