तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका लिहिणारे लेखक अभिषेक मकवाना यांनी आत्महत्या केली आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका आहे. या मालिकेचे लेखक अभिषेक मकवाना यांनी आत्महत्या केली. अभिषेक यांनी कर्ज घेतल्यानंतर त्यांना ब्लॅकमेल केलं जात होतं, त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचललं असावं असा संशय त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. अभिषेक मकवाना यांना कर्ज घेतल्यापासून फोनवरुन धमक्या दिल्या जात होत्या. कर्ज फेडण्यासाठी त्यांच्यावर वारंवार दबाव आणला जात होता. अभिषेक मकवाना हे सायबर फ्रॉडचे बळी ठरले असंही त्यांच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे. अभिषेक मकवाना यांचा मृत्यू हा अपघाती झाला आहे अशी नोंद आधी चारकोप पोलिसांनी केली होती. मात्र आता ही आत्महत्या असल्याचं समोर आलं आहे. 27 नोव्हेंबरला अभिषेक मकवाना यांनी आत्महत्या केली. यानंतर पोलिसांनी त्यांच्या घरातल्यांचे जबाब नोंदवले आहेत.