Tuesday, January 26, 2021 | 09:01 PM

संपादकीय

लोकशाहीचा आत्मा जपावा

भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने तीन तारखा अत्यंत महत्त्वाच्या आहेत

क्रिकेटर सुरेश रैना, गायक गुरु रंधावा यांना नोटीस
22-Dec-2020 02:10 PM

मुंबई । वृत्तसंस्था

मुंबई पोलिसांची जेडब्लु मॅरियेट हॉटेलमधील ड्रॅगन फ्लाय पबवर मोठी कारवाई केली आहे. कोव्हिडच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हॉटेलमधील स्टाफ आणि ग्राहकांवर कारवाई करण्यात आली आहे.

या पार्टीसाठी काही लोक कालच दिल्ली आणि दुबईवरून आले होते. जेडब्लू या हॉटेलमधील पार्टीमध्ये सहभागी झाले होते अशी माहिती मिळत आहे. या पार्टीमध्ये क्रिकेटर सुरेश रैना, गायक गुरू रंधावा, सुसेन रोशन खान हेसुद्धा या पार्टीत सहभागी होते अशी  माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांच्याविरोधात 41- अंतर्गत नोटिस बजावून सगळ्यांना सोडण्यात आले आहे. सर्वांवर आपत्ती व्यवस्थान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रॅपर बादशाह या पार्टीतून फरार झाल्याचीही माहिती मिळत आहे. एकून 34 लोक या पार्टीत सहभागी होते.

कोव्हिड काळात सरकारने नियम शिथिल केले आहेत. या नियमांना बाधील राहुनच पार्टींचे नियोजन करणे गरजेचे आहे. तरीसुद्धा अशाप्रकारच्या पार्ट्या नियमांना धाब्यावर बसवून कशा पद्धतीने सुरू आहेत याचे हे उदाहरण आहे. मुंबईत रात्रीचा कर्फू लागू करण्यात आला असताना अशा प्रकारच्या पार्टी आयोजित करणार्‍यांवर पोलिसप्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

ब्रिटनमध्ये धोकादायक ठरत असलेल्या नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईत रात्रीची संचारबंदी जाहीर करण्यात आला आहे. रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलिसांना पार्टीविषयी माहिती मिळाली. या पार्टीत सहभागी असलेल्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे’

विश्‍वास नांगरे पाटील,

पोलिस उपायुक्त, कायदा सुव्यवस्था, मुंबई

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top