मुंबई  

 डायरेक्टरेट ऑफ रेव्हन्यू इंटेलीजनस  च्या अधिकार्‍याने ड्रग्जच अांतर्राष्ट्रीय रॅकेट उध्वस्त केलं आहे. 1000 कोटी किमतीच्या 191 किलो नावाशिवा येथून हे ड्रग्ज जप्त करण्यात आले. या संदर्भात ज्या कंपनीच्या नावे हे ड्रग्ज आले होते. त्या कंपनीच्या मालकाला आणि त्याच्या दोन कर्मचार्‍यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणांमध्ये आधीच दोघांना अटक करण्यात आली असती. सुरेश भाटीया हा दिल्लीमध्ये असलेल्या सर्विस एक्सपोर्ट्सचा मालक असून मोहम्मद नौमान आणि महेंद्र निगम या दोन कर्मचार्‍यांना दिल्लीतून  अटक करून मुंबईत आण्यात आलं.

 निगम हा सुरेश भाटियासाठी नौमानच्या सांगण्यावरून लॉजिस्टिकच काम पाहायचा, नौमान  भाटियाचा अत्यंत विश्‍वासू माणूस असून आयात करण्यापासून ते ड्रग्जच्या डिलिव्हरी पर्यंत सर्व काम तो स्वतः पहायचा आणि स्वतःच्या देखरेखीमध्ये ती काम करून घ्यायचा.

 सुरेश भाटियावर याआधीच सुद्धा गुन्हा दाखल आहे, 2008 मध्ये हा आशिषच्या स्मगलिंगमध्ये  आरोपी होता तर त्याचा विश्‍वासू नौमानवर सुद्धा यापूर्वी गुन्हा दाखल आहे. आतापर्यंतच्या तपासात समोर आलं आहे की, नौमानला कस्टम क्लिअरिंगची जबाबदारी देण्यात आले होती, तसेच नौमान हे ड्रग्ज मीनानाथ बोडके आणि कोंडी भाऊ गुंजल या दोघांना पोहोचवायचा, या दोघांना आधीच शनिवारी अटक करण्यात आली.

 नवी मुंबई च्या नेरुळमध्ये राहणारा बोडके एम बी शिपिंग कंपनी आणि लॉजिस्टिक सोल्युशन्स मध्ये पार्टनर होता, या कंपनी कन्साईन्मेंट कंटेनर नंबर 2267955 क्लियर करण्याची जबाबदारी होती. नौमानच्या म्हणण्यावरून बोडके कस्टममधून पार्सल काढून द्यायचा, नौमान आणि बोडकेची ओळख बोडकेचा नातेवाईक असलेला गुंजाळ जो मुंब्रा मध्ये राहतो त्यानी करून दिली होती. नौमान आणि बोडके जुन 2019 पासून संपर्कात होते.

अवश्य वाचा