Friday, March 05, 2021 | 06:39 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

कर्ज फेडण्यासाठी बनावट नोटा छापणार्‍या तरुणाला बेड्या
मुंबई
19-Feb-2021 03:38 PM

मुंबई

। मुंबई । प्रतिनिधी । 

बनावट नोटा छापणार्‍या एका भामट्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 57 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपीचे नाव मोहम्मद फकीयान अयूब खान असून पोलीस अधिक तपास करत असून कर्ज फेडण्यासाठी त्यानी घरातच नोटा छापण्याचा कारखाना सुरू केला होता.

क्राईम ब्रांचचे एसपी नितीन अलकनुरे यांनी माहिती दिली की, एक तरूण चेंबूर येथे बनावट नोटांची विक्री करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती. क्राईम ब्रांच यूनीट चारचे निरिक्षक निनाद सावंत आणि त्यांच्या टीमने एमएमआरडीए कॉलनीजवळ माहुल गावात सापळा रचून तरूणाला बेड्या ठोकल्या आणि त्याच्याकडून 57 हजार रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या.तपासा दरम्यान आरोपीने पोलिसांना काही बनावट नोटा घरी ठेवल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरी छापा टाकला. यामध्ये 3 लाख 98 हजार 550 रुपयांच्या नोटा आणि इतर साहित्य जप्त केले.

आठ वर्षापूर्वी खान मुंबईत आला होता. मुंबईत तो आपल्या नातेवाईकांकडे कपड्याचा व्यवसाय करत होता. परंतु या नोकरीतमध्ये कमी पगार मिळत होता. त्यानंतर त्याने स्वत:चा कपड्याचा व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने आपल्या पत्नीचे दागिने गहान ठेऊन व्यवसाय सुरू केला. कोरोनाकाळात लॉकडाऊनचा फटका व्यवसायाला बसला. यामध्ये त्याचे नुकसान झाले आणि सहा लाखांचे कर्ज झाले.कर्ज फेडणे त्याला शक्य होत नव्हतं आणि नोकरी मिळणे लॉकडाऊनमुळे अवघड होते. म्हणून खानने नकली नोटा बनवून आपलं कर्ज परत फेडण्याचा पर्याय निवडला आणि शेवटी तुरुंगात पोहोचला.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top