मुंबई 

अभिनेत्री कंगना रणौत आणि तिची बहीण रंगोली यांच्या विरोधात मुंबईतल्या वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वांद्रे न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. त्यामुळे कंगना हिच्या अडचणीत आता वाढ झाली आहे.

 मुस्लिम असल्याने आपल्याला काम न दिल्याचा आरोप करत, साहिल सय्यद याने वांद्रे न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सुनावणीदरम्यान कंगनाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तर मुंबईचा पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तान असा उल्लेख करतही तिने ट्विट केले होते. त्या प्रकरणीही तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले गेले. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांच्याविरोधात शहरातील वकिलांनी बुधवारी दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. सोशल मीडिया पोस्टद्वारे दोन धार्मिक गटांमधील वैर वाढवल्याचा आरोप करण्यात आला होता.

 वांद्रे न्यायालयात कंगनाविरोधात दोघांनी याचिका दाखल केली होती. याचिका करताना म्हटले होते, कंगना बॉलिवूडमधील हिंदू आणि मुस्लीम कलाकारांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. याशिवाय ती हिंदू-मुस्लीम समुदायात धार्मिक तेढ वाढवत आहे. कंगना ही अनेकवेळा आक्षेपार्ह ट्विट करत आहे. त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होत आहे. तसेच बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे, असे म्हटले आहे.

अवश्य वाचा

गर्भातील बाळाला दिले रक्त