पनवेल  

कामोठे येथून अक्टीव्हा स्कुटीवरून मुंबई बाजूकडे बीएआरसी येथे कामावर जाणार्‍या तरूणीचा सायन-पनवेल महामार्गावर खारघर नजिक स्कुटी घसरून ती खाली पडल्याने त्यात तीचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे.

भक्ती अदाटे (वय-26) असे या तरूणीचे नाव असून ती कामोठे वसाहतीमध्ये से.-20 येथे राहण्यास आहे. ती नेहमीप्रमाणे स्कुटी घेऊन कामावर जात असताना खारघर टोलनाका येथे अचानक पाऊस आल्याने तिची स्कुटी भर रस्त्यात घसरल्याने तीच्या डोक्यावरील हेलमेट खाली पडले व त्यात ती खाली रस्त्यावर पडून गंभीररित्या जखमी झाली. तातडीने तिला रूग्णालयात उपचारार्थ नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची नोंद खारघर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सहा. पोलिस निरीक्षक राठो़ड करीत आहेत. 

अवश्य वाचा

गर्भातील बाळाला दिले रक्त