मुंबई 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात गावाकडे जायची घाई अनेकांच्या जीवावरच बेतली असून,राज्यात विरार आणि कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या दोन रस्ता अपघातात सातजणांचा बळी गेली आहे.

विरारमध्ये अपघातात चौघे ठार

 विरार 

लॉकडाऊनमुळे प्रवासी साधने बंद असल्याने पायी प्रवास करुन घरी जाणार्‍या सात मजुरांचा विरारमध्ये मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. भरधाव टेम्पोने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.

 कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने, या व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. सर्वच प्रवासी साधने बंद असल्याने लोकांनी पायी घरी जाण्यास सुरुवात केली आहे. वसईमध्ये कामानिमित्त असलेले हे सात जण आपल्या घरी म्हणजे गुजरातला जात होते. परंतु संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्यामुळे, गुजरातकडील हद्द बंद असल्याने त्यांना परत पाठवण्यात आलं होतं. वसईच्या दिशेने परत येत असताना मुंबई-अहमदाबाद महामार्गावर विरार हद्दीतील भारोल परिसरात एका भरधाव आयशर टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली.

 

अवश्य वाचा