कोल्हापूर 

कोल्हापूरकरांसाठी खुशखबर आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मटणापासून दूर राहवे लागलेल्या कोल्हापूरकरांच्या ताटात मटण येणार आहे. मटण विक्रेते कृती समितीने 520 रुपये प्रतिकिलो दराने उत्तम प्रतीच्या मटणाची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापुरात मटणाच्या दरावरून वाद निर्माण झाला होता. मात्र, या वादावर तोडगा निघाल्याने ग्राहक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिक यांना हायसे वाटले आहे.

कोल्हापुरात मटण दरवाढ झाल्यानंतर मटण दरवाढविरोधी कृती समितीन प्रतिकिलो 480 रुपये दराने मटणाची विक्री व्हावी, असा आग्रह धरला होता. मात्र, हा दर परवडत नसल्याचे सांगत मटण विक्रेत्यांनी विक्री बंद ठेवली होती. या निर्णयामुळे हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मटणविक्री बंद असल्याने हॉटेल व्यावसायिकांनी फक्त चिकन देणे सुरू केले होते.

 

अवश्य वाचा