Tuesday, April 13, 2021 | 01:22 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

...म्हणून रितिका फोगाटने केली आत्महत्या
18-Mar-2021 01:51 PM

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था । 

जागतिक कुस्तीमध्ये देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणार्‍या गीता आणि बबिता फोगाट यांच्या यशाची कथा सर्वांना माहिती आहे. लढाऊ वृत्तीच्या या कुटुंबावर एक दु:खाचे डोंगर कोसळले आहे.

दंगल गर्ल अशी ओळख असलेल्या गीता आणि बबिता फोगाट यांच्या बहिणीने कुस्तीत पराभव झाल्याने टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केली. गीता-बबिताच्या पावलावर पाऊल ठेवत रितिका फोगाटने कुस्तीच्या अखाड्यात प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत तिने भाग घेता होता. ही स्पर्धा 12 ते 14 मार्च दरम्यान राजस्थानमधील भरतपूर येथे झाली होती.

17 वर्षीय रितिकाने सब ज्युनिअरमधील 53 किलो गटात भाग घेतला होता. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तिचा एक गुणाने पराभवाला सामोरे जावे लागले होते. रितिका गेल्या 5 वर्षापासून महावीर फोगाट यांच्याकडे कुस्तीचे धडे घेत होती. पण अंतिम सामन्यात पराभव झालेल्या रितिकाला पराभव पचवता आला नाही. तिने गळफास घेऊन आत्महत्या केली.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top