माजी वर्ल्ड चॅम्पियन विश्‍वनाथन आनंदने लेजेंड्स ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेतील सहा पराभवांची मालिका खंडित करताना सातव्या फेरीत बोरिस गेलफँडला एक डाव बाकी असतानाच 2.5-0.5 असे हरवून पहिला विजय नोंदवला.

2012 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप लढत याच दोघांत झाली होती. त्याचाच हा रिप्ले होता. त्यावेळी क्लासिकल लढतीत बरोबरी झाल्यानंतर रॅपिड डाव घेण्यात आले होते आणि आनंदने त्यात बाजी मारत विश्‍वविजेतेपद स्वतःकडेच राखले होते. येथील सामन्यात मात्र गेलफँडपेक्षा आनंद खूपच सरस खेळताना दिसला. आनंदने या स्पर्धेची सुरुवात संथपणे केली. मात्र गेल्या दोन फे़-यांत त्याने आर्मागेडॉन टायब्रेकपर्यंत डाव लांबवत गुण मिळविले आहेत. सातव्या फेरीत तर त्याने पूर्ण तीन गुण वसूल केले.

गेल्या तीन दिवसांचा विचार करता ही स्पर्धा पूर्णतः खराब गेली असे म्हणता येणार नाही. मात्र विजय मिळविल्यानंतर खूप बरे वाटले. खरं म्हणजे आर्मागेडॉनबद्दल मी विसरूनच गेलो होतो. यामध्ये चालीनंतर वाढीव वेळ मिळत नाही. पण नियमित खेळात मात्र प्रत्येक चालीनंतर वाढीव वेळ मिळत असतो. आर्मागेडॉनमध्ये फक्त पटावरील खेळ महत्त्वाचा व निर्णायक ठरतो, असे आनंद म्हणाला.

 

अवश्य वाचा