भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली गेल्याकाही दिवसांपासून चांगल्या फॉर्मात आहे. अनेक महत्वाच्या मालिकांमध्ये विराटने भारतीय संघाला विजेतेपद मिळवून दिलं. फलंदाजीतही विराटने अनेक विक्रम मोडले. भारताचे माजी कर्णधार सुनिल गावसकर यांनी विराटच्या खेळाचं कौतुक करताना, त्याच्या आणि व्हिव रिचर्ड्स यांच्या खेळात साम्य असल्याचं म्हटलं आहे. फलंदाजी करत असताना व्हिव रिचर्ड्स यांच्यावर अंकुश ठेवणं सोपं नव्हतं. त्याच पद्धतीने तुम्ही विराटला फलंदाजी करताना पहा, एक्स्ट्रा कव्हरमधून चौकार खेचताना त्याचं फुटवर्क हाताची ठेवण या सर्व गोष्टी पाहण्यासारख्या असतात. विराट रिचर्ड्सप्रमाणेच मिड-ऑन, मिड-विकेटच्या दिशेने फटका खेळताना बॉटम हँडचा खुबीने वापर करतो. म्हणूनच विराट सध्या जगातला पहिल्या क्रमांकाचा फलंदाज आहे. त्याच्या आणि रिचर्ड्स यांच्या फलंदाजीत बरच साम्य आहे. गावसकरांनी आपलं मत मांडलं.