ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थीमने यूएस ओपन 2020 चं विजेतेपद पटकावलं आहे. पुरुष एकेरी गटाच्या अंतिम फेरीत डॉमनिक थीमने जर्मनीच्या अलेक्झांडर ज्वेरेवला 2-6, 4-6, 6-4, 6-3, 7-6 अशा सेटमध्ये पराभूत केलं. डॉमनिक थीमच्या रुपात यूस ओपनला सहा वर्षांनंतर नवा चॅम्पियन मिळाला आहे. त्याच्याआधी 2014 मध्ये क्रोएशियाच्या मारिन सिलिचने यूएस ओपनच्या फायनलमध्ये जपानच्या के केई निशिकोरीला पराभूत केलं होतं.

विशेष म्हणजे जर्मनीचा अलेक्झांड ज्वेरेव आणि ऑस्ट्रियाचा डॉमनिक थीम हे दोघेही पहिल्यांदाच यूएस ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचले होते. 23 वर्षीय अलेक्झांडर ज्वेरेव हा त्याच्या कारकीर्दीत पहिल्यांदाच एखाद्या ग्रॅण्डस्लॅमच्या अंतिम फेरीत खेळला. तर 27 वर्षीय डॉमनिक थीम यूएस ओपनच्या फायनलमध्ये पोहोचणारा पहिलाच ऑस्ट्रियन टेनिसपटू ठरला.जागतिक क्रमवारीत तिसर्‍या स्थानावर असलेल्या डॉमनिक थीमचं हे पहिलंच ग्रॅण्ड स्लॅम जेतेपद आहे. यूएस ओपनच्या रोमहर्षक अंतिम सामन्यात त्याने अलेक्झांडर ज्वेरेवला 2-6, 4-6, 6-4, 6-3, 7-6 अशा सेटमध्ये पराभूत केलं. विशेष म्हणजे यूएस ओपनच्या अंतिम सामन्यात पहिले दोन सेट गमावल्यानंतरही जेतेपदावर नाव कोरल्याचं 71 वर्षांनी घडलं आहे. याआधी पांचो गोंजालेजने 1949 मध्ये हा पराक्रम केला होता. पहिल्यांदाच विजेत्याचा फैसला टायब्रेकरद्वारे झाला.

अवश्य वाचा