। सिडनी । वृत्तसंस्था ।
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात तिसरा कसोटी सामना 7-11 जानेवारीदरम्यान सिडनी क्रिकेट ग्राऊंडमध्ये खेळला जाणार आहे. या तिसर्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. हिटमॅन रोहित शर्माने संघात पुनरागमन केलं आहे. तर वेगवान गोलंदाज नवदीप सैनीला संधी देण्यात आली आहे. यानिमित्ताने सैनीचं कसोटी पदार्पण ठरणार आहे. तिसर्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा तिसर्या सामन्यासाठी टीम इंडिया : अजिंक्य रहाणे (कर्णधार ), रोहित शर्मा ( उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि नवदीप सैनी