Thursday, January 21, 2021 | 12:32 AM

संपादकीय

‘बर्ड फ्लू’चा वाढता धोका

संकटं एकटी-दुकटी न येता चोहीकडून येतात आणि घेरुन टाकतात

रोहितची 11 डिसेंबरला तंदुरुस्ती चाचणी
28-Nov-2020 02:32 PM

धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माच्या तंदुरुस्तीविषयी कोणतीही कल्पना नसल्याची नाराजी कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केल्यानंतर अखेर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्याच्या तंदुरुस्तीबाबतचे स्पष्टीकरण दिले. वडिलांच्या आजारपणामुळे तो ऑस्ट्रेलियाला रवाना होत नसून त्याची तंदुरुस्ती चाचणी 11 डिसेंबरला होणार असल्याचे सांगत बीसीसीआयने रोहितच्या तंदुरुस्तीबाबतच्या चर्चेला पूर्णविराम दिला.

वडील आजारी असल्याने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आटोपल्यावर रोहित थेट मुंबईत परतला. आता त्याचे वडील आजारपणातून सावरत आहेत. त्यानंतर तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सामील होऊन आपल्या पुनर्वसन कार्यक्रमाला सुरुवात करेल,असे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले. यजमान ऑस्ट्रेलियाच्या 14 दिवसांच्या विलगीकरणाच्या नियमामुळे रोहित पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकणार आहे. कोहलीने रोहितच्या तंदुरुस्तीविषयी कोणतीही माहिती नसल्याची नाराजी व्यक्त केली होती.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top