Saturday, December 05, 2020 | 11:02 AM

संपादकीय

गुंतवणुकीसाठी स्पर्धा

महाराष्ट्रातील गुंतवणूक आपल्या राज्यात यावी यासाठी यापूर्वी स्पर्धेत असलेल्या...

गोलंदाजांची कामगिरी निर्णायक!
21-Nov-2020 12:07 PM

भारत-ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांत दर्जेदार वेगवान गोलंदाजांचा समावेश असून ज्यांचे गोलंदाज सातत्याने दमदार कामगिरी करतील, तोच संघ संपूर्ण दौर्‍यात वर्चस्व गाजवेल, अशी प्रतिक्रिया भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने व्यक्त केली.

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍याला 27 नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे. या दौर्‍यात प्रत्येकी तीन एकदिवसीय आणि ट्वेन्टी-20 लढती खेळण्याबरोबरच उभय संघांत चार कसोटी सामन्यांची मालिकाही रंगणार आहे. भारताकडे जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, तर ऑस्ट्रेलियाकडे मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स यांच्या रूपात प्रतिभावान वेगवान गोलंदाज आहेत. त्यामुळे या दौर्‍यात गोलंदाजांचे द्वंद्व पाहायला मिळेल, असे 42 वर्षीय झहीरला वाटते.

ऑस्ट्रेलियातील खेळपट्टयांवर वेगवान गोलंदाजांचे नेहमीच वर्चस्व पाहायला मिळाले आहे. त्याशिवाय गेल्या काही वर्षांत भारताच्या वेगवान गोलंदाजांची फळी ऑस्ट्रेलियाच्या तोडीची झाली आहे. आधुनिक क्रिकेटमध्ये ज्या वेगवान गोलंदाजांचे आपण नाव घेतो, त्यातीलच काही चेहरे आपल्याला संपूर्ण मालिकेदरम्यान खेळताना दिसतील. त्यामुळे ज्या संघांचे वेगवान गोलंदाज छाप पाडतील, तोच संघ मालिका विजयाचा प्रबळ दावेदार असेल, असे झहीर म्हणाला.

विशेषत: कसोटी मालिकेत बुमरा, शमी, इशांत शर्मा आणि स्टार्क, कमिन्स, जोश हेझलवूड यांच्यातील द्वंद्व पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. त्यांच्या स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लबूशेन या आघाडीच्या फलंदाजांविरुद्ध भारताच्या वेगवान त्रिकुटाची कामगिरी निर्णायक ठरेल, असेही झहीरने सांगितले.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top