Wednesday, December 02, 2020 | 11:01 AM

संपादकीय

शेतकर्‍यांचा एल्गार

राजधानी दिल्लीत कडाक्याच्या भर थंडीत शेतकर्‍यांनी घेराव घातल्याने......

कसोटी सामन्यांमध्ये 500 विकेटचं लक्ष्य पूर्ण करणार...
20-Nov-2020 04:07 PM

आस्ट्रेलियाचा मुख्य फिरकी गोलंदाज नॅथन लियोन याने कोरोना संसर्गाच्या काळात क्रिकेटपासून दूर राहिल्यामुळं कसोटी सामना खेळण्याची उत्सुकता वाढल्याचे सांगितले. लियोन याने कोरोनामुळं कसोटी सामन्यांच्या रोमांचक खेळापासून दूर राहावं लागलं असं म्हटलं आहे. नॅथन लियोननं याकाळात कसोटी सामन्यांमध्ये 500 विकेट मिळवण्याची उमेद जागृत झाल्याचे सांगितले.

ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाच नॅथन लियोननं आतापर्यंत 96 कसोटी सामने खेळले आहेत. नॅथन लियोन सध्या दोन विक्रम प्रस्थापित करण्यापासून काही पावलं दूर आहे. भारताविरुद्धचे सर्व कसोटी सामन्यात नॅथन लियोन खेळल्यास त्याचे 100 कसोटी सामने पूर्ण होतील. तर, कसोटी सामन्यात त्याने 390 विकेट घेतल्या आहेत. 10 विकेट घेतल्यास तो 400 विकेटचा टप्पा पूर्ण करु शकतो. ऑस्ट्रेलियासाठी ऑफ स्पिनर म्हणून नॅथन लियोननं आतापर्यंत सर्वाधिक बळी घेतले आहेत.  ऑस्ट्रेलियासाठी यापुढील काळात योगदान द्यायचे आहे. कसोटी सामन्यात 500 बळी मिळवणे हे ध्येय असल्याचा पुनरुच्चार लियोन यानं केला.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top