कोरोनामुळे तब्बल 5 महिने बंद असलेलं क्रिकेट ऑगस्ट महिन्यात पुन्हा सुरू झालं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटनंतर कॅरेबियन बेटांवर संपूर्ण टी20 स्पर्धादेखील सुखरूप पार पडली. आता जगभरातील सर्वात लोकप्रिय अशा आपीएल स्पर्धेला आजपासून प्रारंभ होणार आहे. यंदाच आपीएल इतर स्पर्धांपेक्षा वेगळं असणार आहे. याचं कारण यंदा आपीएलचा  संपूर्ण हंगाम भारताबाहेर युएईमध्ये खेळला जाणार आहे. तसेच स्टेडियममध्येही प्रेक्षकांच्या जागी केवळ रिकाम्या खुर्च्या असणार आहेत. सुरेश रैना, लसिथ मलिंगा, हरभजन सिंग यांसारख्या अनुभवी खेळाडूंनी माघार घेतल्याने स्पर्धेची रंगत काहीशी कमी झाली आहे. पण आपीएलचं मुख्य आकर्षण, सर्वांचा चाहता कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी मात्र दीर्घ काळच्या विश्रांतीनंतर मैदानात उतरणार आहे.

2019च्या विश्‍वचषक स्पर्धेत भारताला न्यूझीलंडकडून उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. त्यानंतर धोनीने दीर्घ विश्रांती घेतली. मधल्या काळात काही वेळा धोनीला पुनरागमनाची संधी होती. पण काही वेळा धोनीने संधी नाकारली तर काही वेळा संघ व्यवस्थापनाने त्याला नकार कळवला. त्यातच आपीएल आणि नंतर  धोनी अखेर 15 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. पण आपीएलमध्ये तो खेळत राहणार असल्याने चाहत्यांना हायसं वाटलं. त्यानुसार आता तब्बल 436 दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर धोनी अखेर आज मैदानावर उतरताना दिसणार आहे. दिवसांनी मैदानावर परतणार

 

अवश्य वाचा