लंडन   

लिव्हरपूलचे महान खेळाडू केनी डॅलग्लिश यांना कोरोनाची लागण झाल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. अर्थात, त्यांना कोरोना लागण झाल्याचे कोणतेही लक्षण दिसून आले नाही, ते आश्‍चर्याचे असल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी नमूद केले.

69 वर्षीय माजी स्कॉटिश आंतरराष्ट्रीय स्ट्रायकर असणाऱया डॅलग्लिश यांनी सेल्टिकच्या माध्यमातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. बुधवारी त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले. प्रारंभी, कोरोनाची कोणतीही लक्षणे त्यांच्यात आढळून आली नाही. पण, तरीही चाचणी घेण्यात आली, त्यावेळी त्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. इस्पितळात दाखल होण्यापूर्वी ते स्वतःहून क्वारन्टाईन झाले होते आणि या क्वारन्टाईनचा कालावधी नेहमीच्या प्रमाणापेक्षा अधिक होता. पण, तरीही त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांचे कुटुंबीय देखील चिंतेत आहे.

डॅलग्लिश यांनी सेल्टिककडून खेळताना स्कॉटिश लीग स्पर्धा जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला. त्यांनी एकंदरीत चारवेळा संघाला जेतेपद मिळवून दिले. नंतर 1977 मध्ये त्यांनी लिव्हरपूल संघात दाखल होण्याचा निर्णय घेतला. ऍनफिल्डवर त्यांनी आठ इंग्लिश ली जेतेपदे, तीन एफए चषक स्पर्धा व तीन युरोपियन चषक स्पर्धा जिंकल्या. 13 वर्षांच्या कालावधीत त्यांनी खेळाडू व मॅनेजर या नात्याने त्यांनी धवल यश प्राप्त केले. लिव्हरपूलचे माजी कर्णधार स्टीव्हन गेरार्ड यांनी इन्स्टाग्रामवर डॅलग्लिश यांच्यासोबतचे एक छायाचित्र पोस्ट करत लवकर बरे होण्यासाठी अभीष्टचिंतन केले.

 

अवश्य वाचा

एक गूढकथा संपली!