युएई,

 संयुक्त अरब अमिरात...म्हणजेच यूएई. मध्यपूर्वेतील याच संपन्न देशात शनिवारपासून (19 सप्टेंबर) पुढचे जवळपास दोन महिने यंदाच्या आयपीएलचा महासोहळा रंगणार आहे.

 खरंतर दरवर्षीप्रमाणे मार्च ते मे दरम्यान आयपीएल खेळवली जाणार होती. पण भारतात कोरोनाचा प्रभाव वाढला आणि ही स्पर्धा देशाबाहेर खेळवण्याच्या चर्चा सुरु झाल्या. त्यासाठी श्रीलंका, दक्षिण आफ्रिका यांसारखे पर्यायही समोर आले. पण अखेर कोरोनाचा कमीतकमी प्रभाव असलेल्या यूएईत आयपीएलच्या तेराव्या मोसमाचं आयोजन करण्याचं बीसीसीआयने पक्क केलं.  यूएईची राजधानी अबुधाबी, दुबई आणि शारजाह या तीन महत्त्वाच्या शहरांमध्ये आयपीएलचं हे युद्ध रंगणार आहे.

  कोरोना व्हायरसचं सावट असल्यामुळं यंदाच्या वर्षी काही महिने उशिरानं का असेना, पण आयपीएलचं नवं पर्व सुरु होणार आहे. त्यासोबतच सुरुवात होणार आहे ती म्हणजे सट्टाबाजाराला.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या घडीला मुंबईच्या संघाला सट्टेबाजांची, बुकींची विशेष पसंती आहे. त्यांच्यावर 4.90 रुपये इतका भाव लावण्यात आला आहे. मुंबई मागोमाग हैदराबादच्या संघाला बुकींकडून पसंती दिली जात असल्याचं कळत आहे.

 युएईमध्ये होणार्‍या आयपीएल क्रिकेट सामन्यांच्या शुभारंभाच्या काही तास आधीच गुरुग्राम पोलिसांनी त्यांची इंटेलिजंट विंग, क्राईम ब्रांचचा एक चमू आणि सर्व जिल्ह्यांतील स्टेशन ऑफिसर यांना सट्टेबाजांवर करडी नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय गुन्हेगारांवरही यावेळी करडी नजर असेल. एकिकडे सट्टेबाजार आटोक्यात आणण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागलेल्या असतानाच दुसरीकडे बुकींनीही विविध संघांवर बोली लावण्यास सुरुवात केल्याची माहिती उघड होत आहे.  

 संघांच्या किमती खालीलप्रमाणे...

 मुंबई- 4.90 रुपये

हैदराबाद - 5.60 रुपये

चेन्नई- 5 रुपये

बंगळुरू - 6.20 रुपये

दिल्ली - 6.40 रुपये

कोलकाता- 7.80 रुपये

पंजाब - 9.50 रुपये

राजस्थान - 10 रुपये

अवश्य वाचा

गर्भातील बाळाला दिले रक्त