‘आयपीएल’चा १३ वा हंगाम यावर्षी ३० मार्चपासून प्रारंभ होणार होता, परंतु करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वप्रथम १५ एप्रिलपर्यंत ही स्पर्धा लांबणीवर पडली. त्यानंतर मात्र ही स्पर्धा रद्द होण्यापर्यंतच्या चर्चाना सुरुवात झाली. मात्र ‘बीसीसीआय’ने कठीण काळातही स्पर्धेचे आयोजन करण्याचे ठरवले. अमिराती क्रिकेट मंडळाच्या साथीने यंदा प्रथमच रिकाम्या स्टेडियम्समध्ये ही स्पर्धा होणार आहे. ‘आयपीएल’च्या पहिल्या लढतीत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार आहेत.

कधी पाहाल सामना :

आज, शनिवारी सायंकाळी ७.३० वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.

कुठे पाहाल सामना –

स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स २ आणि स्टार स्पोर्ट्स हिंदी १ या वाहिन्यावर सामना पाहता येईल. शिवाय Disney+Hotstar VIP वरही ऑनलाइन सामना पाहू शकता.

हवामान-

अबू धाबीमधील शेख जायद क्रिकेट स्टेडियममध्ये होणाऱ्या आयपीएलमधील सलामीच्या सामन्यात पाऊस कोसळण्याची कोणतीही शक्यता नाही. आकाश निरभ्र राहणार असून तापमान ३५ अंश सेल्सियसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे भीषण गर्मी आणि उकाडा असेल.

कसं असेल मैदान (पीच रिपोर्ट) –

अबू धाबीमधील शेख जायद क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी पूरक मानली जातेय. या मैदानावर फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मैदान मोठे असल्यामुळे फलंदाज फिरकीविरुद्ध धोका पत्करण्याची शक्यता कमीच आहे. येथील मैदानावर सरासरी १८० धावसंख्या निघू शकेल असा अंदाजही क्रीडा तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

इतिहास मुंबईच्या बाजूने –

मुंबई आणि चेन्नई ‘आयपीएल’मध्ये आतापर्यंत २८ वेळा आमनेसामने आले असून मुंबईने १७, तर चेन्नईने ११ सामने जिंकले आहेत. गेल्या पाच लढतीत मुंबईने विजय मिळवला आहे. यामध्ये २०१८मधील एक, तर २०१९मधील चार (दोन साखळी, एक बाद आणि अंतिम फेरी) लढतींचा समावेश आहे. सलामीच्या सामन्यात आतापर्यंत तीन वेळा मुंबई-चेन्नई एकमेकांसमोर आले आहेत. यापैंकी मुंबईने दोन, तर चेन्नईने एक लढत जिंकली आहे.

चेन्नईचा संघ : महेंद्र सिंह धोनी (कर्णधार), अंबाती रायुडू, केएम आसिफ, दीपक चाहर, ड्वेन ब्रावो, फैफ डु प्लेसी, इम्रान ताहिर, नारायण जगदीशन, कर्ण शर्मा, केदार जाधव, लुंगी एनगिडी, मिशेल सँटनर, मोनू कुमार, मुरली विजय, रविंद्र जाडेजा, ऋतुराज गायकवाड, शेन वॉटसन, शार्दुल ठाकूर, सॅम करन, पीयूष चावला, जोश हेजलवूड, आर. किशोर

मुंबईचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), दिग्विजय देशमुख, क्विंटन डिकॉक, आदित्य तरे, सौरभ तिवारी, जसप्रीत बुमराह, धवल कुलकर्णी, नाथन कूल्टर नाइल, ट्रेंट बोल्ट, जयंत यादव, सूर्यकुमार यादव, कुणाल पांड्या, कायरन पोलार्ड, राहुल चाहर, क्रीस लीन, हार्दिक पांड्या, शेरफने रदरफोर्ड, अनमोलप्रीत सिंह, मोहसिन खान, मिशेल मॅक्लिनेगन, प्रिंस बलवंत राय सिंह, अनुकूल रॉय, इशान किशन

 

अवश्य वाचा