आयपीएलच्या 13व्या हंगामातील पहिला महामुकाबला मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. मुंबईने सर्वाधिक चार वेळा तर चेन्नईने 3 वेळा विजेतेपद मिळवले आहे. दोन्ही संघ स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहेत. गेल्या वर्षी फायनलमध्ये हे दोन्ही संघ लढले होते. तेव्हा मुंबईने चेन्नईवर निसटता विजय मिळवला होता. आता दोन्ही संघ पुन्हा विजयाासाठी मैदानात उतरतील.

या वर्षी मुंबईचा संघ विक्रमी पाचवे विजेतेपद मिळवण्यासाठी मैदानात उतरेल तर चेन्नईचा संघ मुंबईच्या विक्रमाशी बरोबरी करण्याचा प्रयत्न करेल. आयपीएलच्या इतिहासात चेन्नई संघाने नेहमी प्लेऑफमध्ये प्रवेश केला. ते या स्पर्धेचे पाच वेळा उपविजेते ठरले आहेत. 2016 आणि 17 या दोन वर्षांसाठी त्यांच्यावर बंदी घातली होती. त्यानंतर 2018 साली शानदार कामगिरी करत विजेतेपद मिळवले.

दोन्ही संघात आतापर्यंत 28 सामने झाले आहेत. त्यापैकी चेन्नई संघाने 11 तर मुंबई संघाने 17 सामने जिंकले आहेत. त्यामुळे चेन्नईवर दबाव अधिक असेल.असा असेल संभाव्य संघ- मुंबई इंडियन्स- रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डिकॉक(विकेटकिपर), इशान किशन, सुर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, किरॉन पोलार्ड, क्रुणाल पांड्या, नाथन कुल्टर नाइल राहुल चाहर, जसप्रित बुमराह आणि ट्रेंट बोल्ट

चेन्नई सुपर किंग्ज- महेंद्र सिंह धोनी (कर्णधार आणि विकेटकिपर), शेन वॉट्सन, अंबाती रायडू, फाफ डुप्लिसिस, केदार जाधव, रविंद्र जडेजा, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकूर, पीयुष चावला, दीपक चाहर आणि इमरान ताहिर.

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना आज संध्याकाळी साडे सात वाजता सुरू होणार

 

अवश्य वाचा