ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वन-डे सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणार्या भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. 66 धावांनी ऑस्ट्रेलियाने भारतावर मात केली. या पराभवानंतर षटकांची गती कायम न राखल्याप्रकरणी आयसीसीने भारतीय खेळाडूंवर कारवाई केली आहे. भारतीय खेळाडूंच्या मानधनातली 20 टक्के रक्कम कापून घेतली जाणार आहे. सामनाधिकारी डेव्हिड बून यांनी हा निर्णय सूनावला.
पहिला वन-डे सामना संपण्यासाठी भारतीय वेळेनुसार जवळपास 6 वाजले होते. काही ऑस्ट्रेलियन खेळाडूंनीही सामना लांबल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. सामन्यातील पंच रॉड टकर, सॅम नोगाजस्की आणि तिसरे पंच पॉल रेफेल यांनी दिलेल्या तक्रारीवरुन भारतीय संघावर ही कारवाई करण्यात आली. रविवारी दोन्ही संघात दुसरा वन-डे सामना खेळवला जाणार आहे.