बहुप्रतिक्षित टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौर्याची सुरुवात आजपासून झाली आहे. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात दमदार झाली. सलामीवीर अॅरॉन फिंच आणि डेव्हिड वॉर्नरने अर्धशतके झळकावली आहेत. ऑस्ट्रेलियाने अतिशय संयमी सुरुवात केली. पहिल्या बॅटिंग पॉवरप्लेमध्ये कुठलीही घाई न करता अॅरॉन फिंच आणि डेव्हिड वॉर्नरने एकेरी दुहेरीवर भर देत धावफलक हलता ठेवला. पहिल्या 10 ओव्हरमध्ये फिंच-वॉर्नर जोडीने 51 रन्स केले तर नंतरच्या 20 ओव्हरमध्ये 103 धावा केल्या. यादरम्यान फिंच वॉर्नरने आपापली अर्धशतके पूर्ण केली.