भारतीय वन-डे संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उप-कर्णधार रोहित शर्मा यांनी आयसीसीच्या वन-डे क्रमवारीत आपलं पहिलं आणि दुसरं स्थान कायम राखलं आहे. तर गोलंदाजांच्या यादीत भारताचा युवा गोलंदाज जसप्रीत बुमराह दुसर्‍या स्थानी कायम राहिला आहे. गुरुवारी आयसीसीने एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली.

आयसीसीनं जाहिर केलेल्या यादीत विराट 871 गुणांसह पहिल्या तर रोहित 855 गुणांसह दुसर्‍या स्थानावर आहे. पाकिस्तानचा बाबर आजम 829 गुणांसह तिसर्‍या स्थानावर आहे. तर रॉस टेलर 818 अन् डुप्लिसिस 790 गुणांसह चौथ्या अन् पाचव्या स्थानावर आहेत. केन विल्यमसन 765 गुणांसह सहाव्या स्थानावर पोहचला आहे. त्याला दोन गुणांचा फायदा झाला आहे. अ‍ॅरोन फिंच सातव्या, डेविड वॉर्नर आठव्या आणि डिकॉक दहाव्या स्थानावर आहेत. इंग्लंडच्या जॉनी बेयरस्टोला ऑस्ट्रेलियाबरोबरच्या नुकत्याच झालेल्या मालिकेतील कामगिरीचा फायदा झाला आहे. जॉनी बेयरस्टोने क्रमवारीत अव्वल दहामध्ये स्थान मिळवलं आहे.

 

अवश्य वाचा