Thursday, January 21, 2021 | 12:59 AM

संपादकीय

‘बर्ड फ्लू’चा वाढता धोका

संकटं एकटी-दुकटी न येता चोहीकडून येतात आणि घेरुन टाकतात

आयसीसीच्या नियमांमध्ये बदल, टीम इंडियाने कसोटी अजिंक्यपद....
20-Nov-2020 05:20 PM

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे रद्द झालेले सामने आणि परिस्थितीचा अंदाज घेता आयसीसीने आपल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या नियमांमध्ये बदल केला आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये मिळवलेल्या गुणांच्या सरासरीवरुन अंतिम फेरीतले दोन संघ निवडले जाणार आहेत. आयसीसीने नियमात बदल केल्यानंतर भारतीय संघाने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतलं अव्वल स्थान गमावलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने सर्वोत्तम सरासरीच्या जोरावर भारताला मागे टाकत अव्वल स्थान पटकावलं आहे. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये भारतीय संघाने आश्‍वासक कामगिरी केली होती. आतापर्यंत खेळवण्यात आलेल्या 4 मालिकांमधून भारतीय संघाने 7 सामने जिंकत अव्वल स्थान मिळवलं होतं. न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत झालेला पराभव हा भारताचा कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतला एकमेव पराभव होता. भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर असून या मालिकेत दोन्ही संघांमध्ये 3 वन-डे, 3 टी-20 आणि 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top