Monday, January 25, 2021 | 03:51 PM

संपादकीय

नव्या वर्षातली गुंतवणूकवाट

नवं वर्ष सुरू होत असताना बरेचजण काही ना काही संकल्प करतात

विराट कोहलीवर गंभीर निशाणा....
30-Nov-2020 03:26 PM

भारतीय  क्रिकेट संघाचा माजी ओपनिंग बॅट्समन गौतम गंभीरने  ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या सलग दुसर्‍या पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीवर  टीका केली आहे. त्याने कर्णधार कोहलीने घेतलेल्या निर्णयांवर टीका करत नाराजी व्यक्त केली आहे. दुसर्‍या वनडेमध्ये पावरप्ले मध्ये जसप्रीत बुमराहकडून दोन षटक टाकले गेले. गंभीरने सांगितले की, आपण पाठोपाठ विकेट घेण्यासंदर्भात बोलत होतो. मात्र मुख्य गोलंदाजाला संधीच नाही दिली तर विकेट कशा मिळतील?, असा सवाल गौतम गंभीर याने केला आहे.

गोलंदाजांच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयांसंदर्भात क्रिकइन्फोच्या एका शो मध्ये विराट कोहलीवर टीका केली. ममी अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो की कर्णधार म्हणून ही रणनिती मला कळू शकलेली नाही. आपण एकाबाजूला विकेट मिळवण्यासंदर्भात बोलत आहोत मात्र असे असताना महत्त्वाच्या गोलंदाजाला आपण केवळ दोन ओवर करवतो हे न कळण्यासारखे आहे.  असं गंभीर म्हणाला. खरंतर वनडे मध्ये 4-3-3 ओवर असा स्पेल असतो. 3 ओवर जास्त योग्य ठरतात आणि कोणत्याही गोलंदाजांना एका स्पेलमध्ये 4 ओवर देतात.  असं ही गंभीरने सांगितले.

जर नव्या बॉलने केवळ महत्त्वाच्या गोलंदाजाकडून केवळ दोन ओवर करण्यास सांगून नंतर थांबवत असेल तर हा काय डाव आहे हे मला कळालं नाही. कदाचित मला त्याची कर्णधारी कळत नाही. हा काही टी 20 क्रिकेट सामना नाही. भारताचा पराभव झाला, याचे कारण कोहलीची खराब कप्तानी महत्त्वाचे म्हणजे दोन्ही वनडे मध्ये भारतीय गोलंदाज छोटे-छोटे स्पेल करताना दिसले आणि गोलंदाजीत बदल दिसला, असं ही ते म्हणाले.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top