Wednesday, May 19, 2021 | 02:43 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

आयपीएलचे 14 वे पर्व आजपासून
09-Apr-2021 01:42 PM

 

 । चेन्नई । वृत्तसंस्था ।

जगातील सर्वात लोकप्रिय इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 14व्या पर्वाचा थरार कोरोना प्रकोपात शुक्रवारपासून (दि. 9) रंगणार आहे. प्रेक्षकांविना सर्व सामने बायोबबल्समध्ये खेळविले जातील. सलामीचा सामना गतविजेता मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात होत आहे.

रोहितच्या नेतृत्वाखालील मुंबई संघ जेतेपदाच्या हॅट्ट्रिकसाठी खेळणार असून, विराटच्या आरसीबी संघाची नजर मात्र पहिल्या जेतेपदाकडे असेल. अनुभवी महेंद्रसिंह धोनीवरदेखील लक्ष असेल. त्याच्या नेतृत्वाखालील सीएसके संघ मागच्यावर्षी प्ले ऑफ गाठण्यात अपयशी ठरल्यामुळे यंदा नव्या डावपेचांसह उतरणार आहे. पाच महिन्यात दोनदा लीगचे आयोजन होत असल्याने हितधारकांसाठी आदर्शस्थिती नाही. प्रेक्षकांसाठी मात्र कोरोना संकटात सात आठवडे मनोरंजनाची पर्वणी असेल. उत्तुंग षटकार, यॉर्कर, नव्या दमाच्या खेळाडूंची कामगिरी न्याहाळण्याची चाहत्यांना संधी राहील.

मागच्या काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट परतली. दररोज एक लाखाहून अधिक रुग्ण बाधित होत आहेत. आयपीएलशी संबंधित खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला लागण झाल्यानंतरदेखील स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. बायोबबल्समध्ये यूएईप्रमाणे भारतातही हे आयोजन यशस्वी होईल, अशी बीसीसीआयला आशा आहे. ऑक्टोबरमध्ये टी-20 विश्‍वचषकाचे आयोजन भारतात होणार असल्यामुळे आयपीएलचे यशस्वी आयोजन होणे आयोजकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानले जाते.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top