मिन्स्क 

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असल्याने सुमारे दोनशेहून अधिक देशातील व्यवहार, दळणवळण खेळ ठप्प झाले आहे. मात्र बेलारुस हा युरोपमधील एकमेव देश असा आहे की जेथे अशा स्थितीतही फुटबॉल खेळले जात आहे. मात्र आता कोरोनाच्या भीतीमुळे प्रेक्षक या लीगमधील सामन्यांना हजेरी लावण्याचे टाळू लागले आहेत.

ग्रोन्डो या शहरात शुक्रवारी स्थानिक संघ एफसी नेमान ग्रोन्डो व एफसी बेलशिना बॉबुइस्क यांच्यातील सामना अनिर्णीत राहिला आणि या सामन्याला जेमतेम 253 प्रेक्षक उपस्थित होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या फारच अत्यल्प आहे. नेमानच्या सामन्यासाठी मागील वर्षी सुमारे 1500 प्रेक्षक उपस्थित होते. आजूबाजूच्या देशात फुटबॉलपासून वंचित राहिलेल्या शौकिनांना या लीगमुळे आकर्षण निर्माण झाले आहे. बेलारुसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी पूर्ण लॉकडाऊन करण्यास विरोध दाखविला असल्याने फुटबॉल आयोजकांनीही सामना प्रेक्षकांसाठी खुला ठेवला आहे.

ङ्गहो, प्रेक्षकांची अल्प उपस्थिती हीच मुख्य समस्या आहे,फ असे बेलशिनाचे प्रशिक्षक एदुआर्द ग्रॅडोबोएव्ह यांनी प्रेक्षकांसंदर्भात विचारल्यावर सांगितले. ङ्गफुटबॉल हा प्रेक्षकांचा खेळ आहे. असे असताना अर्ध्या रिकामी स्टेडियममध्ये खेळताना फारसे समाधान वाटत नाही. निदान ग्रोन्डोमध्ये तरी रिकामी स्टेडियम पाहणे प्रशस्त वाटत नाही,फ असेही ते म्हणाले. कोरोना व्हायरसची भीती असल्याने नेमान ग्रोन्डोच्या चाहत्यांनीही त्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. ङ्गकोरोना प्रसाराचा धोका टाळण्यासाठी घरीच रहा आणि स्वतःसह प्रियजनांचेही संरक्षण करा,फ असे आवाहन त्यांनी निवदेनातून केले आहे.

या पूर्व युरोपीयन देशात कोरोना व्हायरसची लागण झालेली फार कमी प्रकरणे असून त्याची वाढही कमी झाली असल्याने फुटबॉल सामने खेळविण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्टीकरणे बेलारुस फुटबॉल फेडरेशनने दिले. ताज्या आकडेवारीनुसार बेलारुसमध्ये 2226 कोरोनाची लागण झालेले रुग्ण असून 23 बळी गेले आहेत. फेडरेशनच्या निर्णयाशी आम्हाला सहमती दर्शवावी लागली. त्यांनी सामने खेळविण्याचा निर्णय घेतला म्हणून आम्ही खेळलो, असे नेमानचे प्रशिक्षक इगोर कोव्हालेविच म्हणाले. मात्र क्लब सर्व ती काळजी घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सॅनिटायजर्सचा वापर आणि चाहत्यांना एकमेकांपासून दूर बसवणे, असे उपाय करण्यात येत आहेत.

 

अवश्य वाचा

फरमानशेठ दफेदार यांचे निधन