दिल्ली 

दिल्ली : मवंदे भारत मिशनफ अंतर्गत अनेक परदेशात अडकलेल्या अनेक भारतीयांना देशात आणण्याचा प्रयत्न सुरू असतानाच या मोहिमेला मोठा धक्का बसलाय. एअर इंडियाचे पाच पायलट करोनाग्रस्त आढळले आहेत. मवंदे भारत मिशनफ अंतर्गत एअर इंडियाच्या विमानांद्वारे परदेशी भारतीय देशात दाखल होत आहेत. याशिवाय, लॉकडाऊन दरम्यान देशातील वेगवेगळ्या भागांत अत्यावश्यक सामान आणि औषधं पोहचवण्याचं काम एअर इंडियावर सोपवण्यात आलंय.

एअर इंडियाचे पायलटही करोनाच्या जाळ्यात अलगद अडकल्यानं चिंता व्यक्त केली जातेय. उड्डाण भरण्यापूर्वी 72 तास अगोदर झालेल्या करोना चाचणीत ते पॉझिटिव्ह आढळले. हे सर्व पायलट मुंबईत  आहेत  आणि पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली आयसोलेट करण्यात आलंय. एअर इंडियाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पायलट कार्गो विमान घेऊन काही दिवसांपूर्वी चीनला गेले होते.

उल्लेखनीय म्हणजे, ङ्गवंदे भारत मिशनफ अंतर्गत गेल्या 24 तासांत 800 हून अधिक भारतीय मायदेशात परतलेत. परदेशांत अडकलेल्या प्रवाशांना घेऊन 12 देशांमधून विमानं देशात दाखल होत आहेत. देशातील 14 शहरांमध्ये 64 फ्लाईटस् उतरणार आहेत. ही विमानं छोट्या - छोट्या विमानतळांवरदेखील उतरतील.

मवंदे भारत मिशनफ दरम्यान आखाती देशांतून 27 उड्डाणं, संयुक्त अरब अमिरातमधून 11, बांग्लादेशमधून 7, दक्षिण पूर्व आशियातून 14, अमेरिकेतून 7 उड्डाणं तसंच लंडनमधून 7 उड्डाणं घेत विमाने भारतासाठी रवाना होत आहेत, अशी माहिती दिली आहे.

अवश्य वाचा

एक गूढकथा संपली!