Thursday, January 21, 2021 | 12:28 AM

संपादकीय

‘बर्ड फ्लू’चा वाढता धोका

संकटं एकटी-दुकटी न येता चोहीकडून येतात आणि घेरुन टाकतात

पहिल्या टी-20 सामन्यात इंग्लंडची बाजी
28-Nov-2020 01:13 PM

दक्षिण आफ्रिका दौर्‍यावर असलेल्या इंग्लंड संघाने धडाकेबाज सुरुवात केली आहे. केप टाऊन येथे झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात इंग्लंडने जॉनी बेअरस्टोच्या धडाकेबाज अर्धशतकी खेळाच्या जोरावर यजमान दक्षिण आफ्रिकेवर 5 गडी राखून मात केली.

नाणेफेक जिंकत इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली असली तरीही कर्णधार क्विंटन डी-कॉक, अनुभवी फाफ डु प्लेसिस आणि मधल्या फळीतल्या फलंदाजांनी फटकेबाजी करत संघाला 179 धावांचा टप्पा गाठून दिला. डु-प्लेसिसने आपल्या अनुभवाला साजेसा खेळ करत 40 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांसह 58 धावा केल्या. इंग्लंडकडून सॅम करनने 3 तर जोफ्रा आर्चर-टॉम करन आणि ख्रिस जॉर्डन या त्रिकुटाने प्रत्येकी 1-1 बळी घेतला.

प्रत्युत्तरादाखल इंग्लंडची सुरुवात खराब झाली. सलामीवीर जेसन रॉय आणि जोस बटलर हे स्वस्तात माघारी परतले. मलानही फारशी चमक दाखवू शकला नाही. 3 बाद 34 अशी परिस्थिती असताना जॉनी बेअरस्टोने सामन्याची सूत्र आपल्या हाती घेत मैदानात फटकेबाजीला सुरुवात केली. बेन स्टोक्सनेही त्याला उत्तम साथ दिली. आफ्रिकन गोलंदाजांचा समाचार घेत बेअरस्टोने 48 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 86 धावा करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. दक्षिण आफ्रिकेकडून जॉर्ज लिंडे, एन्गिडी यांनी प्रत्येकी 2-2 आणि शम्सीने 1 बळी घेतला.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top