नवी दिल्ली  

जागतिक क्रिकेटमधील सर्वात आदरणीय व्यक्तिमत्त्वापैकी एक असलेल्या माजी इंग्लिश कर्णधार नासीर हुसेनने महेंदसिंग धोनीमध्ये अद्याप बरेच क्रिकेट बाकी असून त्याला इतक्यात निवृत्त करु नका, अशी विनंतीवजा सूचना  केली. धोनीसारखे खेळाडू सातत्याने घडत नसतात. त्यामुळे त्याला गरजेपेक्षा आधीच निवृत्ती स्वीकारणे भाग पाडू नका, असे तो म्हणाला.

ङ्गधोनी एकदा निवृत्त झाल्यानंतर तो पुन्हा मैदानात परतणार नाही. मुळात क्रिकेट हा असा खेळ आहे, ज्यात त्याच्यासारखे महान खेळाडू सारखे घडत नाहीत. सध्याच्या घडीला धोनीची मानसिक स्थिती फक्त तो स्वतःच जाणतो आणि अंतिमतः निवडकर्ते संघ निश्‍चित करतात आणि त्यांना जो खेळाडू हवा असेल त्याला पाचारण करतातफ, असे नासीर हुसेनने नमूद केले.

महेंद्रसिंग धोनीने गतवर्षी जुलै महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी विश्‍वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीचा सामना खेळला आणि तोच त्याच्यासाठी आतापर्यंतचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला आहे. त्यानंतर धोनीने अगदी प्रथमश्रेणी क्रिकेटही खेळलेले नाही. विश्‍वचषक स्पर्धा संपन्न झाल्यानंतर त्याने लष्करी सेवा बजावणार असल्याने संघासाठी उपलब्ध राहू शकणार नसल्याचे मंडळाला कळवले. पण, त्यानंतर तो राष्ट्रीय संघात परतण्यासाठी अगदी प्रथमश्रेणी क्रिकेटही खेळला नाही. अगदी सुनील गावसकर व कपिल देव यांनी देखील जितका कालावधी लोटत जाईल, तितके धोनीला पुन्हा संघात परतणे कठीण होईल, असे आग्रहाने म्हटले होते.

1993 ते 2003 या कालावधीत इंग्लंडचे नेतृत्व करणाऱया हुसेन यांचे मत मात्र त्यापेक्षा वेगळे आहे. ङ्गधोनी भारतीय संघात परतण्यासाठी पुरेसा सक्षम आहे का, असा प्रश्‍न कोणी विचारला तर मी होकारार्थी उत्तर देईन. कारण, त्याच्यात अद्याप बरेच क्रिकेट बाकी आहे, हे मला पदोपदी जाणवतेफ, असे नासीर हुसेनने पुढे सांगितले.

अर्थात, याचवेळी आयसीसी वनडे विश्‍वचषक स्पर्धेतील दोन-एक सामन्यात धोनीला आपला खेळ उंचावता आला नसल्याचे तो आवर्जून म्हणाला. आता त्या दोन लढती कोणत्या, याचा थेट उल्लेख नासीर हुसेनने केला नाही. पण, त्या स्पर्धेत विंडीज व इंग्लंडविरुद्ध झालेल्या लढतीत धोनीला अपेक्षित खेळ साकारण्यात अपयश आले होते. इतका अपवाद वगळता धोनीमध्ये उत्तम क्रिकेट बाकी असून त्याला पुनरागमनाची संधी मिळायलाच हवी, असे मत नासीरने मांडले.

 

अवश्य वाचा

फरमानशेठ दफेदार यांचे निधन