सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने पहिला सेट गमावल्यानंतर धडाके बाज पुनरागमन करत ब्रिटनच्या कायले एडमंडचे आव्हान परतवून लावत अमेरिकन खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेची तिसरी फेरी गाठली. चौथ्या मानांकित स्टेपानोस त्सित्सिपासनेही आगेकूच केली आहे. महिलांमध्ये मात्र अग्रमानांकित कॅरोनिला प्लिस्कोव्हा आणि दोन ग्रँडस्लॅम विजेती गार्बिन मुगुरुझा यांना दुसर्‍याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला.

पुरुषांमध्ये रॉजर फेडरर आणि राफेल नदाल या नामांकित खेळाडूंच्या अनुपस्थितीत खेळणार्‍या जोकोव्हिचने एडमंडला 6-7 (5/7), 6-3, 6-4, 6-2 असे नमवले. ग्रीसच्या त्सित्सिपासने अमेरिकेच्या मॅक्सिम क्रेसेला दुसर्‍या फेरीत 7-6 (7/2), 6-3, 6-4 असे हरवत विजयी घोडदौड कायम राखली.  पाचव्या मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्हाने अमेरिकेच्या ब्रँडन नाकाशिमावर 7-5, 6-7 (8/10), 6-3, 6-1 अशी मात केली. बेल्जियमच्या सातव्या मानांकित डेव्हिड गॉफिनने दक्षिण आफ्रिकेच्या लॉइड हॅरिसचा 6-7 (6/8), 6-4, 1-6, 4-6 असा पाडाव केला.

महिलांमध्ये फ्रान्सच्या कॅ रोलिना गार्सियाने प्लिस्कोव्हाला 6-1, 7-6 (7/2) असा पराभवाचा धक्का दिला. जागतिक क्रमवारीत 50व्या स्थानी असणार्‍या गार्सिलाला तिसर्‍या फेरीत अमेरिके च्या 28व्या मानांकित जेनिफर ब्रॅडी हिच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. बल्गेरियाच्या तेताना पिरोंकोव्हाने 10व्या मानांकित मुगुरुझाला 7-5, 6-3 असे सरळ सेटमध्ये नमवले. जपानच्या दोन ग्रँडस्लॅम विजेत्या चौथ्या मानांकित नाओमी ओसाकाने इटलीच्या कॅमिला जिऑर्जीचा 6-1, 6-2 असा धुव्वा उडवला. सहाव्या मानांकित पेट्रा क्विटोव्हाने युक्रेनच्या कॅटरिना कोझलोव्हा हिला 7-6 (7/3), 6-2 असे पराभूत केले.

भारताचा दिविज शरण आणि त्याचा सर्बियाचा साथीदार निकोला कॅकिक यांना अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या पहिल्याच सामन्यात आठव्या मानांकित निकोला मेकटिक आणि वेस्ली

कुल्हॉफ यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. क्रोएशियाच्या जोडीने शरण-कॅकिक यांच्यावर 4-6, 3-6, 6-3 अशी मात केली. रोहन बोपण्णा आणि त्याचा कॅनडाचा साथीदार डेनिस शापोलाव्ह यांचा पहिल्या फे रीतील सामना अमेरिके च्या एर्नेस्टो इस्कोबेडो आणि नोआ रुबिन यांच्याशी होणार आहे.

 

अवश्य वाचा