Wednesday, May 19, 2021 | 02:34 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

आयपीएलकडे क्रिकेट प्रेक्षकांची पाठ
02-May-2021 05:28 PM

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

संपूर्ण देश करोनाच्या तडाख्याचा सामना करत असून काही शहरांमध्ये टाळेबंदीमुळे लोक घरातच आहे. पण तरीही इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) प्रेक्षकसंख्येला फटका बसला आहे. गेल्या वर्षी संयुक्त अरब अमिरातीत झालेल्या आयपीएलपेक्षा यंदा प्रेक्षकसंख्येत घट झाल्याचे समोर आले आहे.

गेल्या वर्षी प्हिल्या टप्प्यातील 14 सामने तब्बल 8.34 अब्ज चाहत्यांनी पाहिले होते. पण यंदा फक्त 6.62 लोकांनी ङ्गआयपीएलफला प्रतिसाद दिला आहे. 2019मध्ये हीच संख्या पहिल्या 17 सामन्यांसाठी 6.07 अब्ज इतकी होती.

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु यांच्यात झालेल्या उद्घाटनाच्या सामन्याकडेही प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे.  आयपीएल च्या प्रसारणकर्त्यां स्टार स्पोर्ट्स वाहिनीने मात्र 2019च्या सलामीच्या सामन्यापेक्षा त्यात 42 टक्क्यांनी वाढ झाल्याचे म्हटले आहे. पण 2020च्या तुलनेत सलामीच्या सामन्याला जवळपास 25 ते 30 टक्के चाहत्यांनी कमी प्रतिसाद दिला आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सच्या सामन्यांना चाहत्यांनी भरघोस पाठिंबा दिला आहे. दूरचित्रवाणीवर प्रेक्षकांकडून सर्वाधिक पाहिल्या जाणार्‍या पहिल्या पाच कार्यक्रमांमध्ये मुंबईच्या तीन सामन्यांचा समावेश आहे. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्याला सर्वाधिक प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top