सुरेश रैना या हंगामात आयपीएल खेळणार की नाही, याबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही. पण जर रैना खेळणार नसले तर त्याच्या जागी कोणत्या खेळाडूला स्थान द्यायचे, याचा विचार चेन्नई सुपर किंग्सने केला आहे. रैनाच्या जागी ट्वेन्टी-२० क्रिकेटमधल्या अव्वल फलंदाजाला चेन्नईने आपल्या संघात स्थान दिले आहे.

मलान हा ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत ८७७ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. मलान हा मधल्या फळीत येऊन धडाकेबाज खेळी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. रैनाही मधल्या फळीत येऊन फलंदाजी करायचा. त्यामुळे मलान हा रैनासाठी योग्य पर्याय असल्याचे चेन्नईच्या संघाला वाटत आहे. त्यामुळे चेन्नईचा संघ सध्याच्या घडीला मलानबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे समजत होते. पण चेन्नईच्या संघाचा परेदशी खेळाडूंचा कोटा आता पूर्ण झाल्याचे समजत आहे. त्यामुळे मलानला संघात कसे घ्यायचे, याचा विचार चेन्नईचा संघ करत असेल.

 

अवश्य वाचा

गर्भातील बाळाला दिले रक्त