वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष डेव्ह कॅमेरून सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अध्यक्षपदाच्या शर्यतीत असून त्यांनी भविष्यातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटविषयीचा आपला दृष्टिकोन प्रकट केला. फुटबॉलप्रमाणेच कमीत कमी आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि जास्तीत जास्त ट्वेन्टी-20 लीग खेळवाव्यात, असे मत त्यांनी व्यक्त केले. कॅमेरून यांना अध्यक्षपदाच्या शर्यतीसाठी अद्याप वेस्ट इंडिज मंडळाचा पाठिंबा मिळाला नसला तरी आपल्याकडे पुरेसी मते असल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटविषयी ते म्हणाले की, इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) प्रदीर्घ काळ व्हावी. तसेच इंग्लिश प्रीमियर लीग, ला-लीगा आणि सेरी-ए फुटबॉल स्पर्धाच्या धर्तीवर जगातील सर्व ट्वेन्टी-20 लीग एकाच वेळी खेळवण्यात याव्यात. अफगाणिस्तान आणि आर्यलडसारख्या छोटया देशांसाठी कसोटी क्रिकेट बंधनकारक नसावे तर त्यांच्या पसंतीचे असावे.

अवश्य वाचा