Tuesday, April 13, 2021 | 01:35 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

क्रिकेटर शफाली वर्मा अव्वल
23-Mar-2021 08:22 PM

 

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर फलंदाज शफाली वर्मा आयसीसीच्या ताज्या महिला टी-20 क्रमवारीत पुन्हा अव्वलस्थानी आली आहे.दक्षिण आफ्रिकेबरोबर सुरु असलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेमध्ये तिने पहिल्या दोन सामन्यात 23 आणि 47 धावा केल्या. शफालीने ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनीला बाजुला हटवत प्रथम स्थान गाठले आहे.गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या महिला टी-20 विश्‍वचषकात चमकदार कामगिरी करत 17 वर्षीय शफाने टी-20 क्रमवारीत पहिले स्थान मिळवले होते. गोलंदाजीत फिरकीपटू दीप्ती शर्मा 40व्या स्थानावर पोहोचली आहे. तर रिचा घोष 59 स्थानांची झेप घेत 85व्या स्थानी आली आहे.  गोलंदाजांच्या यादीत अष्टपैलू हर्लीन देओलने 262 स्थानांची झेप घेत फलंदाजांच्या यादीत 99 व्या स्थानी तर, गोलंदाजांच्या यादीत 146व्या स्थानी पोहोचली आहे. भारताची डावखुरी फिरकीपटू राजेश्‍वरी गायकवाड 25व्या स्थानी पोहोचली आहे.

 

 

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top