नवी दिल्ली  

भारतात करोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढताना दिसते आहे. आता ही संख्या 2 हजारांवर पोहोचली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. देशात सध्या 21 दिवसांचे लॉकडाउन असल्याने पंतप्रधान मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, मुंबईकर सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, हिमा दास, पीव्ही सिंधू, महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील विविध 40 महत्त्वाच्या खेळाडूंसोबत संवाद साधला. शुक्रवारी सकाळी 9 वाजता मोदी यांनी देशातील जनतेशी संवाद साधल्यानंतर त्यांनी देशातील 40 लोकप्रिय क्रीडापटूंची तळवशे उेपषशीशपलळपस द्वारे बैठक घेतली.

करोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून पंतप्रधान मोदी यांनी देशातील जनतेशी आज तिसर्‍यांदा संवाद साधला. त्यानंतर मोदी यांनी पहिल्यांदाच देशातील क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाच्या लोकांशी संवाद साधला. सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, विराट कोहली, युवराज सिंग, चेतेश्‍वर पुजारा यांच्यासह पी टी उषा, पुलेला गोपीचंद, विश्‍वनाथन आनंद, हिमा दास, बजरंग पुनिया, पी व्ही सिंधू या नामांकित क्रीडापटूंशी चर्चा केली. या बैठकी दरम्यान करोनामुळे भारतात उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी मोदी यांनी क्रीडाविश्‍वाची साथ मागितली आणि त्यांच्याशी करोनाच्या प्रभावाबाबत चर्चा केल्याचे सांगितले जात आहे.या बैठकीआधी, सकाळी 9 वाजता मोदींनी देशवासीशी 12 मिनिटांचा व्हिडिओ संदेश शेअर केला. ते म्हणाले की करोनाविरूद्ध 9 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये लोकांनी आतापर्यंत शिस्त दाखवली आहे. आता रविवारी 5 एप्रिलला रात्री 9 वाजता सर्व जण 9 मिनिटांसाठी लाईट बंद करून मेणबत्ती, फ्लॅशलाइट, दिवा किंवा मोबाइल फ्लॅश लाईट लावावेत, असे आवाहन मोदी यांनी केले.

अवश्य वाचा