करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी बीसीसीने आपल्या सर्व महत्वाच्या स्पर्धा रद्द केल्या. गेली दोन महिने भारतात कोणत्याही क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले नाही. 29 एप्रिलपासून नियोजित असलेली आयपीएल स्पर्धा देखील अनिश्‍चित काळासाठी स्थगित करण्यात आली. आयपीएल 2020 आयोजन रद्द झाल्यास बीसीसीला सुमारे 4 हजार कोटी रुपयांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आयपीएलचे आयोजन करायचेच असा चंग बीसीसीने बांधला आहे.

25 सप्टेंबर ते 1 नोव्हेंबर या काळात आयपीएल 2020 चे आयोजन करण्याचा विचार बीसीसी करत आहे. त्यातच आता बीसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (साईओ) राहुल जोहरी यांनी आयपीएल बद्दल एक महत्त्वपूर्ण अपडेट दिली आहे.

गेल्या वर्षी देशभरात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जेवढ्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, त्यापेक्षा जास्त लोकांनी आयपीएलचा आस्वाद घेतला. प्रायोजकांसाठी क्रिकेट हाच नेता आहे आणि तोच त्यांना मार्ग दाखवतो. इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा क्रिकेटमुळे जनजीवन सुरळीत होण्यास लवकर मदत होईल. करोनातून जगाला आणि देशाला सावरण्यासाठी थोडा वेळ लागेल यात वादच नाही. ही एका दिवसात होणारी प्रक्रीया नक्कीच नाही,

जेव्हा विमानसेवा सुरू होईल तेव्हा, स्पर्धा सुरू होण्याआधी प्रत्येकाला स्वत:ला क्वारंटाईन करावं लागेल. प्रत्येक खेळाडूचं वेळापत्रक कसं आहे, याबाबत माहिती घेऊनच त्यावर विचार करण्यात येईल. आम्ही सारे खूप आशावादी आहोत. आम्ही आशा करतो की पावसाळा संपेपर्यंत परिस्थिती सुधारली असेल. म्हणून आम्ही पावसाळ्यानंतर आयपीएलच्या आयोजनाचा विचार करत आहोत, अशी माहिती जोहरी यांनी दिली.

 

अवश्य वाचा

एक गूढकथा संपली!