Saturday, December 05, 2020 | 10:32 AM

संपादकीय

गुंतवणुकीसाठी स्पर्धा

महाराष्ट्रातील गुंतवणूक आपल्या राज्यात यावी यासाठी यापूर्वी स्पर्धेत असलेल्या...

नदाल, जोकोव्हिच उपांत्य फेरीत
21-Nov-2020 12:18 PM

एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धा सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच आणि स्पेनचा राफेल नदाल यांनी एटीपी फायन्सल टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.

जोकोव्हिचला यंदा विक्रमी सहाव्यांदा ही स्पर्धा जिंकण्याची संधी आहे. त्याने गटवार साखळीतील अखेरच्या लढतीत जर्मनीच्या सातवा मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्हवर 6-3, 7-6 असा विजय मिळवला.

नदालने पाच वर्षांत प्रथमच या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्यात यश मिळवले. गटवार साखळीतील अखेरच्या लढतीत नदालने ग्रीसचा गतविजेता स्टेफानोस त्सित्सिपासला 6-4, 4-6, 6-2 असे पराभूत केले. उपांत्य फेरीत नदाल विरुद्ध मेदवेदव आणि जोकोव्हिच विरुद्ध डॉमिनिक थिम अशा लढती रंगतील.

आजचा सामना * राफेल नदाल वि. डॅनिल मेदवेदेव * सामन्याची वेळ : सायं. 7:30 वा. * थेट प्रक्षेपण : सोनी टेन 2

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top