। सीडनी । वृत्तसंस्था ।
मार्नस लाबुशेन (67*) आणि विल पुकोव्हस्की (62)यांनी ठोकलेल्या दमदार अर्धशतकी खेळीच्या बळावर पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियानं वर्चस्व राखलं आहे. पहिल्या दिवासाखेर ऑस्ट्रेलियानं दोन गड्यांच्या मोबदल्यात 166 धावा केल्या आहेत. दिवसाखेर लाबुशेन (67) आणि स्मिथ (30) नाबाद आहेत. भारतीय संघाकडून सिराज आणि सैनी यांना प्रत्येकी एक एक विकेट घेण्यात यश मिळालं. सात षटकानंतर पावसाचा व्यत्यय आल्यामुळे सामना थांबवण्यात आला होता. त्यामुळे पहिल्या दिवशी 55 षटकांचा सामना खेळवण्यात आला.
दुखापतीनंतर पुनरागमन करणार्या डेव्हिड वॉर्नरला सिराजनं पाच धावांवर माघारी धाडलं. त्यानंतर भारतीय संघ सामन्यात वरचढ होणार असं वाटलं होतं. मात्र, पदार्पण करणार्या पुकोव्हस्कीनं संयमी फलंदाजी केली. पुकोव्हस्कीला लाबुशेन यानं उत्तम साथ दिली. पुकोव्हस्की-लाबुशेन यांनी दुसर्या गड्यासाठी 100 धावांची भागिदारी केली. अखेर पदार्पण करणार्या सैनीनं पुकोव्हस्कीला पायचीत करत ही जोडी फोडली. पुकोव्हस्कीनं 62 धावांची खेळी केली.पुकोव्हस्की बाद झाल्यानंतर मैदानावर आलेल्या स्मिथनं लाबुशेनबरोबर संथ असेली धावसंख्या वाढवली. एकदिवसीय सामन्याप्रमाणे दोघांनी फटकेबाजी केली. पुकोव्हस्की बाद झाल्यानंतर लाबुशेन यानं सामन्याची सुत्रं आपल्याकडे घेतली. लाबुशेन यानं कारकीर्दीतील नववे अर्धशतकं झळकावलं. स्मिथनं त्याला चांगली साथ दिली. स्मिथ आणि लाबुशेन यांनी तिसर्या गड्यासाठी 60 धावांची नाबाद धावांची भागिदारी करत ऑस्ट्रेलियाची स्थिती आणखी मजबूत केली आहे.