पुढील दोन वर्षांत होणार्‍या दोन ट्वेन्टी-20 विश्‍वचषक स्पर्धाच्या आयोजनाविषयीचा निर्णय घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कार्यकारी मंडळाची शुक्रवारी बैठक होणार आहे. दूरचित्रसंवादाद्वारे होणार्‍या या बैठकीत 2021च्या ट्वेन्टी-20 विश्‍वचषकाच्या यजमानपदासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया उत्सुक आहेत.या बैठकीला बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह तसेच क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे ईर्ल एडिंग्ज आणि निक हॉकले हे उपस्थित राहणार असून 2021 व 2022च्या ट्वेन्टी-20 विश्‍वचषकाच्या आयोजनाविषयी ते आपले म्हणणे मांडतील.

पुढील वर्षी न्यूझीलंडमध्ये होणारी महिलांची एकदिवसीय विश्‍वचषक स्पर्धा तसेच पुरुषांच्या दोन ट्वेन्टी-20 विश्‍वचषकांच्या आयोजनाविषयी या बैठकीत चर्चा होणार आहे. याशिवाय काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे, असे आयसीसीया पदाधिकार्‍याने सांगितले.ऑस्ट्रेलियातील ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारी ट्वेन्टी-20 विश्‍वचषक स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्यामुळे ते 2021साठी आग्रही आहेत. त्यामुळे भारताला 2021ऐवजी 2022च्या ट्वेन्टी-20 विश्‍वचषक स्पर्धेचे यजमानपद मिळू शकते. परंतु 2023मध्ये होणारी एकदिवसीय प्रकाराची विश्‍वचषक स्पर्धा एकच वर्षांच्या अंतराने असल्यामुळे भारतसुद्धा पूर्वनियोजित योजनेनुसार पुढील वर्षीच्या यजमानपदासाठी उत्सुक आहे.

अवश्य वाचा

राज्यभरात पावसाचा धुमाकुळ

नेरळ रेल्वे गेट 21 पासून बंद