वॉशिंग्टन 

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. या निवडणुकीसाठी होणारे पहिले डिबेट 29 सप्टेंबरला ओहियोमध्ये पार पडेल, अशी माहिती कमिशन ऑफ प्रेसिडेन्शिअल डिबेट्सने दिली आहे.

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पार्टीचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात डेमोक्रेट्सचे उमेदवार आणि माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन रिंगणात आहेत. 3 नोव्हेंबरला ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, त्यांच्या डिबेटच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. क्लिव्हलँडच्या केस वेस्टर्न विद्यापीठ आणि क्लिव्हलँड क्लिनिक ही डिबेट होस्ट करणार आहे.पहिली डिबेट 29 सप्टेंबरला हेल्थ एज्युकेशन कॅम्पसमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांच्यात थेट होईल. दुसरी डिबेट 15 ऑक्टोबर रोजी फ्लोरिडातील मायामीमध्ये तर तिसरी डिबेट 22 ऑक्टोबरला होणार आहे. या सर्व डिबेट 90 मिनिटांच्या असतील. त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

अवश्य वाचा