। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
अर्थमंत्र्यांनी 2021-22 या वर्षाच्या अर्थसंकल्पात बळीराजासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्यांसाठी सरकार काय घोषणा करते याची उत्सुकता सर्वाना होती.
बजेटमध्ये शेतकर्यांना खूश करण्याचा प्रयत्न सरकराने केला आहे. बजेट सादर करताना सीतारामन यांनी ग्रामीण भागातील पायाभूत सेवा सुविधांचा विकास करण्यासाठी 40 हजार कोटींची तरतूद केली आहे. किमान आधारभूत किमतीचा फायदा देशातील 1 कोटी 54 लाख शेतकर्यांना झाला असल्याचा दावा सीतारामन यांनी बजेटमध्ये केला. त्या म्हणालया की धान आणि गव्हाची किमान आधारभूत किंमत वाढण्यात आली होती.
गहू खरेदी करताना सरकारने शेतकर्यांना 75060 कोटी देण्यात आले. तर धानासाठी 1.72 लाख कोटी देण्यात आले. जे आर्थिक वर्ष 2020 च्या तुलनेत जास्त असल्याचे त्यांनी सांगितले. डाळींच्या खरेदीसाठी सरकारने शेतकर्यांना 10530 कोटी देण्यात आले. त्याशिवाय कृषी क्षेत्रासाठी पतपुरवठा वाढवण्यात येणार आहे. त्याशिवाय सिंचनासाठी सरकारने बजेटमध्ये 10000 कोटींची तरतूद केली आहे. शेतकर्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सिंचनासाठी आर्थिक मदत मिळणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. त्याशिवाय मत्स व्यवसायाला जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यासाठी पाच मोठ्या बंदरांचा विकास केला जाणार आहे.