Saturday, March 06, 2021 | 01:44 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

मंच तुटला अन् नेते कोसळले
03-Feb-2021 04:56 PM

नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

शेतकर्‍यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी हरियाणातील जिंद येथे आज शेतकरी महापंचायतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी आसपासच्या गावातून मोठ्या प्रमाणावर शेतकरी गोळा झाले होते. मात्र नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याने मंच अचानक तुटला. राकेश टिकैत यांच्यासह अनेक शेतकरी नेते या मंचावर उपस्थित होते. मात्र मंच तुटल्याने ते खाली कोसळल्याची घटना समोर आली आहे. यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला.

भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत हे मंचावर बोलण्यासाठी उभे राहिले. मात्र त्याचवेळी अचानक मंच कोसळला आणि थोडा गोंधळ निर्माण झाला. काही वेळातच मंच व्यवस्थित केल्यानंतर ते पुन्हा मंचावर आले आणि भाग्यवान लोकांचेच व्यासपीठ तुटतात असं म्हणत टिकैत यांनी भाषणाला जोरदार सुरुवात केली. जेव्हा-जेव्हा राजा घाबरतो, तेव्हा-तेव्हा तटबंदी तयार करत असतो. दिल्लीत खिळे ठोकले जात आहेत असं देखील राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे. 

अकाली दलाच्या नेत्या आणि केंद्रातील माजी मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दिल्ली सीमेवर शेतकर्‍यांना अडवण्यासाठी उभारण्यात आलेल्या खिळे असलेल्या सुरक्षेवर टीकास्त्र सोडलं आहे. शेतकर्‍यांना ज्या पद्धतीची वागणूक दिली जातेय, ती लाजिरवाणी गोष्ट आहे असं हरसिमरत कौर यांनी म्हटलं आहे. शेतकरी आंदोलनस्थळाला ज्या पद्धतीनं बालेकिल्ल्याचं स्वरुप दिलं गेलंय, ते पाहून मला या सरकारचं केवळ आश्‍चर्य वाटतं आहे. रत्यावर बॅरिकेडस उभारण्यात आले आहेत, खिळे ठोकले गेलेत इतकंच नाही तर पोलिसांना लोखंडी हत्यारं देण्यात आली आहेत जणू काही सीमेवर पाकिस्तानी उभे आहेत. ही तुमचीच जनता आहे. तुमचेच शेतकरी आहेत, ज्यांना तुम्ही अशा पद्धतीनं वागवत आहात अशी टीका हरसिमरत कौर बादल यांनी केली आहे. 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top