जयपूर

येत्या 31 पासून राज्य विधानसभेचे अधिवेशन आयोजित करण्याची अनुमती द्यावी, असा नवा प्रस्ताव राजस्थान सरकारने राज्यपाल कलराज मिश्रा यांच्याकडे पाठवला आहे. त्यावर राज्यपालांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. राज्यपालांनी अधिवेशन सुरू करण्यासाठी सरकारसमोर तीन अटी ठेवल्या होत्या. सध्या कोरोनाचा कहर सुरू असल्याने सर्व आमदार अपुऱया वेळात राजघानी जयपूर येथे पोहचू शकणार नाहीत. त्यामुळे अधिवेशनापूर्वी 21 दिवसांची नोटीस देण्यात यावी. तसेच आमदारांच्या प्रकृतीची सुरक्षा करण्यासाठी उपाय योजना करण्यात यावी. शिवाय विधानसभेत सामाजिक अंतर राखण्याची व्यवस्था व्हावी, अशा या तीन अटी आहेत. मात्र, राज्यसरकारने त्या मानलेल्या नाहीत असे दिसून येते. त्यामुळे पेचप्रसंग आहे तसाच राहिलेला आहे.

अवश्य वाचा

देशात 61 लाख कोरोनाबाधित

मधुकर कदम यांचे निधन