Tuesday, April 13, 2021 | 01:47 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

राष्ट्रपतींची प्रकृती खालावली
26-Mar-2021 02:35 PM

। दिल्ली । वृत्तसंस्था ।

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना अस्वस्थ वाटू लागल्याने व प्रकृती खालवल्याने त्यांना आज(शुक्रवार) सकाळी दिल्लीमधील आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. या ठिकाणी त्यांची तपासणी सुरू आहे.

छातीत दुखत असल्याने, नियमीत तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.

राष्ट्रपती दोन दिवसांच्या हरिद्वार दौर्‍यावर जाणार होते. पतंजली योगपीठाचा जो पदवीदान समारंभ आहे. यामध्ये राष्ट्रपती सहभागी होणार होते. मात्र मध्येच त्यांची प्रकृती खालवल्याने त्यांचा हा दौरा रद्द करावा लागलेला आहे.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top