Wednesday, May 19, 2021 | 03:00 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

कोरोनाच्या लाटेला निवडणूक आयोग जबाबदार
26-Apr-2021 07:39 PM

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

देश कोरोनाशी लढा देत असताना राजकीय पक्षांना मोर्चा घेण्यास परवानगी दिल्याबद्दल मद्रास उच्च न्यायालयाने भारतीय निवडणूक आयोगावर टीका केली आहे. तसेच, निवडणूक आयोग कोरोनाच्या लाटेला जबाबदार असून, आयोगाच्या अधिकार्‍यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, असे म्हणत न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे.

एका सुनावणीवेळी मद्रास उच्च न्यायालायने, राजकीय पक्षांना प्रचारसभा घेण्यासाठी परवानगी कशी काय दिली जाते? असा प्रश्‍न उपस्थित केला. तसेच, देशातील कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला तुम्हीच जबाबदार आहात, तुमच्या अधिकार्‍यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा, असे म्हणत निवडणूक आयोगाला फटकारले आहे. तसेच, न्यायालयाच्या आदेशानंतरही निवडणूक प्रचारसंभामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची पायमल्ली केली जात असल्याचे दिसून असल्याने न्यायालयाकडून तीव्र नाराजी व्यक्त केली गेली आहे.

मुख्य न्यायाधीश संजीब बॅनर्जी आणि न्यायाधीश न्यायमूर्ती सेंथिलकुमार रामामूर्ती यांच्या खंडपीठासमोर करूर मतदारसंघात मतमोजणीदरम्यान कोव्हिड-19 प्रोटोकॉल सुनिश्‍चित करण्यासाठी पुरेशी सुविधा उपलब्ध आहे की नाही? या विषयावर चिंता व्यक्त करणार्‍या याचिकेवर सुनावणी सुरू होती. या ठिकाणी सुमारे 77 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top