Tuesday, April 13, 2021 | 12:09 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

बजेट 2021 - ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 'हे' फायदे
01-Feb-2021 04:00 PM

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था । 

अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणेमध्ये यापुढे 75 वर्ष वय ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आयकर परतावा भरण्याची गरज नसल्याची तरतूद अर्थमंत्री सीतारमण यांनी केली आहे. हा दिलासा ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. याचाच अर्थ 75 वर्षांवरील नागरिकांना यापुढे कोणताही कर भरावा लागणार नाही.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाकडून प्रत्येकालाच काही ना काही अपेक्षा होत्या. या अर्थसंकल्पाकडे ज्येष्ठ नागरिकांचंही लक्ष होतं. यंदाच्या अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांना सरकारकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे.  

स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षांत 75 वर्षांहून अधिक वय असणार्‍या वृद्धांना मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहेफ असं निर्मला सीतारमण यांनी संसदेसमोर म्हटलं. तसेच मपेन्शनफमधून मिळणार्‍या उत्पन्नावर यापुढे कोणताही कर लावला जाणार नाही, असंही अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केले आहे.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top