Monday, January 18, 2021 | 04:05 PM

संपादकीय

ड्रायव्हरलेस मेट्रोचं लक्षवेधी तंत्र!

किंबहुना, असं म्हणणार्‍यांना वेड्यात काढलं गेलं असतं.

अरे बापरे! सरकारचे 1320 कोटी रुपये कचर्‍यात?
08-Jan-2021 03:38 PM

नवी दिल्ली । वृत्तसंस्था

कोरोना लसीच्या डोसचा साठा सुरुवातीला मर्यादित असेल आणि 10 टक्के डोस हे फेकण्यात येतील. यामुळे लसीकरण मोहीमेत थोडासा व्यत्यय येईल आणि सरकारवर खर्चाचा अतिरिक्त भार पडणार आहे. केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात 30 कोटी नागरिकांना लस देण्याची योजना तयार केली आहे. यासाठी लसीच्या कमीत कमी 60 कोटी डोसची आवश्यकता होती आणि प्रत्येक व्यक्तीसाठी 440 रुपयांचा खर्च अपेक्षित होता. म्हणजेच एकूण खर्च अंदाजे 13,200 कोटी रुपये होता. पण आता पहिल्या टप्प्यासाठी लसीचे एकूण 66 कोटी डोस तयार ठेवाव्या लागतील आणि एकूण खर्च 14,250 कोटी रुपयांवर जाईल. अशाप्रकारे सरकारला अतिरिक्त 1,320 कोटी रुपये खर्च करावे लागतील. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे. याआधी लसीकरणाची रंगीत तालीम अर्थात ड्राय रन आज संपूर्ण देशात पार पडत आहे. देशातील जवळपास 736 जिल्ह्यांमध्ये ही ड्राय रन असणार आहे. यापूर्वी 28 आणि 29 डिसेंबरला 4 राज्यांत दोन दिवसांसाठी ड्राय रन घेण्यात आले. त्यानंतर 2 जानेवारी रोजी सर्व राज्यात ड्राय रन घेतली आणि आता 33 राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पुन्हा लसीकरणाची ड्राय रन सुरू केलं जात आहे. मात्र याच दरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने खरेदी केलेल्या कोरोना लसीचे सुमारे 10 टक्के डोस हे कचर्‍यात फेकावे लागतील. यामुळे सरकारला जवळपास 1320 कोटी रुपयांचा फटका बसणार आहे.

आरोग्य मंत्रालयाने लसीकरणासाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांवरून हे समोर आलं आहे. हे नुकसान प्रत्यक्षात लसींच्या मप्रोग्रेमेटिक वेस्टेजफ स्वरूपात असणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेककडून केंद्र सरकार ज्या लसी विकत घेणार आहे त्यामध्ये कंपनीच्या प्रकल्पापासून ते आरोग्य केंद्रापर्यंतच्या वाहतुकीदरम्यान लसीच्या 100 पैकी 10 डोस खराब होतील आणि ते फेकावे लागतील. यामुळे केंद्र सरकारला 50 व्यक्तींच्या लसीकरणासाठी किमान 110 डोसची ऑर्डर करावी लागेल. प्रत्येक व्यक्तीला कोरोना लसीचे दोन डोस दिले जातील.

गुजरात, पंजाब, आसाम आणि आंध्र प्रदेशात ड्राय रन केल्यानंतर त्याचे परिणाम चांगले दिसून आले. त्यानंतर केंद्र सरकारने ड्राय रन देशभर राबविण्याचा निर्णय घेतला होता. आता पुन्हा एकदा केंद्र सरकार संपूर्ण देशात ड्राय रन होणार आहे. गुरुवारी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसमवेत आढावा बैठक घेतली. सर्व राज्यांचे आरोग्यमंत्री आणि मुख्य अधिकार्‍यांसमवेत झालेल्या बैठकीत डॉ. हर्षवर्धन यांनी लसीविरूद्ध पसरलेल्या चुकीच्या माहितीबद्दल चिंता व्यक्त केली आणि यामुळे लसीकरणाच्या तयारीला धक्का बसू शकेल, असे सांगितले.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top